सुना..
*मैत्रीचं नातं, जपणाऱ्या दोन्ही मित्रांवर टिकून असतं...*
कुणी एकानं येणं जाणं बंद केलं म्हणून दुसऱ्यानं पावलं रोखून धरायची नसतात.
प्रवास दोन्हीकडून सुरू राहिला पाहिजे...
नेहमी सुदामाच पोहे घेऊन आला नाही प्रभू श्रीकृष्ण देखील कधीच मैत्री निभावताना कमी पडले नाहीत...
मैत्रीत कोणीच मोठे नसते. कोणी लहान नसते.
वेळ प्रसंगी दोघानाही दोन पावलं मागे घेणे बंधनकारक असते. तीच मागे घेतलेली दोन पावलं मैत्रीच्या अखंड प्रवासाला वेगवान बनवतात...
अनेकजण मित्रांशी बोलताना हातच्याला ठेवतात... त्यांना असं वाटतं माझे सिक्रेट याला समजेल .... अनेकजण घरातले प्रॉब्लेम सख्खा मित्र असूनही त्याच्याशी बोलत नाहीत.... जेव्हा बाहेरून समजते की मित्राला अडचणी आहेत मात्र त्याला आपल्याला सांगू वाटले नाही तेव्हा दुसऱ्या मित्राला वाईट वाटणे साहजिक आहे.
अनेक मित्र शाळेतले किरकोळ भांडण घेऊन वयाच्या पन्नाशी पर्यंत मतभेद मनात घेऊन समोरून आले तरी बोलत नाहीत. का भांडलो होतो हे देखील अनेकांच्या लक्षात नसते. मात्र मनात एकमेकांविषयी द्वेष असतो तो कायमचा....
अशी मैत्री काय कामाची...
*आमची मैत्री या पलिकडची होती..*
मतभेद काय माहित नव्हते.. मला त्याच्याशिवाय करमत नसे.. घरं लहान , पडकी होती परंतु त्यात एकमेकांसाठी खूप जागा होती ओलावा होता. तसाच *तो* पण होता..
त्याच्यामैत्री सारखं सुख नाही.. जिथं मन मोकळं करू वाटत होतं अशी एकमेव जागा होती. आनंदी आणि दुःखी असताना एकमेकांना प्रथम आठवत होतो..
आयुष्य जेव्हा शेवटच्या घटका मोजत असतं तेव्हा खरी मित्रांची जास्त उणीव भासू लागते..
अनेकजण सोडून गेलेले असतात... अनेकजण भेटत नाहीत... परंतु मैत्रीचा ओलावा आटत नाही...!!
मित्रांनी तो काही छोट्याश्या कारणाने आटू पण देऊ नये...!
मित्र पुन्हा कधी भेटतील माहीत नाही... भेटले तर कोणत्या अवस्थेत असतील ते ही माहित नाही...
मित्रांना जपा... त्यांच्याशी मनमोकळे बोला... एकमेकांच्या समोर इगो येऊ देऊ नका... दोन पावलं मागे घेण्याची तयारी ठेवा... तरच आयुष्यभर मित्र सोबत राहील...
*त्याच्याबद्दल* खूप लिहावसं वाटते आणि कागद ओला होत जातो..
*आमची भेट* शेवटची असेल असे कधी वाटले नव्हते..
सुनील सारखा मित्र पुन्हा *अशक्यच* ..
✍️ विकास गो. पाटील
Comments
Post a Comment